Weather Report: संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासातील पर्जन्यमान : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 21 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : भिरा 6, माणगाव 3, श्रीवर्धन 2, महाड, मुंबई (सांताक्रूझ), संगमेश्वर देवरुख, शहापूर, सुधागड पाली 1 प्रत्येकी.

घाटमाथा: इंगरवाडी 5, अम्बोणे, दावडी, ताम्हिणी 2, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), कोयना (नवजा), खंद 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

03 सप्टेंबर : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

04-05 सप्टेंबर : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

06 सप्टेंबर : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

03 सप्टेंबर : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

04 सप्टेंबर : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

05 सप्टेंबर: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

06 सप्टेंबर: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.