Weather Report: कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

पुणे व मुंबई परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज – कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. पुणे परिसरात मध्यम स्वरूपाचा तर पाऊस पडेल, घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई व उपनगरांमध्ये मध्यम पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: बेलापूर (ठाणे), मुंबई (सांताक्रूझ) 2, डहाणू, मार्मगोवा, रत्नागिरी, वैंगुर्ला 1.प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 5, जळगाव 3, ओझर (नाशिक) 1 प्रत्येकी.

मराठवाडा: औरंगाबाद 4.

विदर्भ: गोंदिया 3, बुलढाणा, चंद्रपूर 2, अमरावती 1.

घाटमाथा: कोयना (नवजा) 9, अम्बोणे 7, शिरगाव, दावडी 6 प्रत्येकी, लोणावळा(ऑफिस), डोंगरवाडी 5 प्रत्येकी, लोणावळा(टाटा), खोपोली 4, शिरोटा, वळवण, कोयना(पोफळी), खांडी, ताम्हिणी 3 प्रत्येकी, वाहनगाव, ठाकूरवाडी, भिवपुरी 2 प्रत्येकी

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: भातसा 6, मध्य वैतरणा 4, वैतरणा, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा 3 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

21 ऑगस्ट: गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

22 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता .

23 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता .

24 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

इशारा:

21 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

22-23 ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

24 ऑगस्ट: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.