Talegaon : खांडगे स्कूलमध्ये नवागतांचे जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्वप्राथमिक विभागातील नवगतांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे आगमन ‘रेड कार्पेट’च्या पायघडीवरून करण्यात आले. आजूबाजूने माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी स्वागतासाठी सज्ज होते. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली गुरव व पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख अपर्णा टेकवडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

छोट्या बालचमूंना शाळेची गोडी लागावी, त्यांनी नियमित शाळेत यावे यासाठी शाळेने आगळे  वेगळे उपक्रम केले.  सर्व शाळा सुशोभित करण्यात आली होती. शालेय जीवनातील शिस्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘पपेट शो दाखवण्यात आला. यामध्ये जंगलातील प्राण्यांची शाळा दाखवून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयीचे महत्त्व सांगण्यात आले. हा ‘पपेट शो’ पूर्वप्राथमिक विभागातील शिक्षिकांनी सादर केला.  शाळेकडून विद्यार्थ्यांना चॉकलेट व बुकमार्क व फुगे देण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पालक वर्ग ही विद्यार्थ्यांच्या अशा स्वागताने आनंदी झाला.

कार्यक्रमाचे संयोजन अपर्णा टेकवडे यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली गुरव यांनी मार्गदर्शन केले.  इतर शिक्षकवृदांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.