Bird Flue : बर्ड फ्ल्यूचं संकट, चिकन अंडी खाण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे काय म्हणणं आहे ? 

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाचा देशात अजूनही फैलाव सुरू असतानाच बर्ड फ्ल्यू संसर्गाने डोकं वर काढलं आहे. केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांत पोल्ट्रीतील कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. अशा काळात चिकन अंडी खान किती सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

बर्ड फ्ल्यूच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने सर्तकतेचा इशारा दिला आहे. मृत पक्षांमध्ये ‘एव्हिन इन्फुएनंजा’ या आजाराचा एच 5 एन 1 हा विषाणू आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, एच 5 एन 1 हा विषाणू पक्षांमध्ये अधिक संसर्गजन्य आणि श्वसनाच्या आजारांना आमंत्रण देतो.

केंद्र सरकारने सर्तकतेचा इशारा म्हणून सर्व राज्याना सूचित करत खरबरदारी घेण्याचं आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत चिकन अंडी खान किती सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ‘स्वच्छ आणि योग्य पद्धतीने शिजवलेले चिकन खाण्यास काहीही हरकत नाही. उष्ण तापमानात हा विषाणू तग धरू शकत नाही, 70 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात हा विषाणू मरतो.’

‘पोल्ट्री मधील कोंबड्या व इतर पक्षी आणि पदार्थ खाताना योग्य पद्धतीने शिजवलेले असावं तसेच हे अन्न बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. कत्तलखाने आणि मृत पक्षांची हाताळणी करताना विशेष काळजी घेतली जावी. अशा ठिकाणाहून विषाणू मानवी शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे’ जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.