Chinchwad News : तरुणाला लिंक ओपन करणे पडले महागात, बसला अडीच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज व्हॉटसअपवर आलेली लिंक ओपन करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे, कारण या लिंकद्वारे तरुणाला तब्बल अडीच लाखांचा गंडा बसला आहे.(Chinchwad News) हा प्रकार चिंचवड येथे ऑनलाईन पद्धतीने 10 जून ते 12 जून 2022 या कालावधीत घडला आहे.

स्वप्नील विलास मुसणे (वय 26 रा.चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.2) फिर्याद दिली असून पोलिसांनी 9007185081 या मोबाईल धारकावर www.tmt5910.in/public/reg/yqm/664307 या लिंकधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime : इन्स्टाग्रामवरून अंमली पदार्थ विकणारा अंमली पदार्थासह अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईल क्रमांच्या व्हॉटसअपवर आरोपीच्या मोबाईल नंबर वरून एक लिंक आली. ती लिंक उघडली असता फिर्यादीच्या नावाचे Musne12  हे  अकाऊंट तयार होऊन वरील आयडीवरून फिर्यादी यांना रोज टास्क मिळत होते.(Chinchwad News) हे टास्क पूर्ण करून नफा कमवा असे आमिष फिर्यादीला देण्यात आले. या टास्कचे निमीत्त करून फिर्यादीकडून पेटीएमद्वारे दोन दिवसात तब्बल 2 लाख 53 हजार रुपये आरोपीने उकळले. मात्र अद्यापही त्याचा मोबदला फिर्यादी यांना न मिळाल्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.