Pune News : बहिणीची छेड काढणाऱ्याला समजावून सांगत असतानाच धारधार शस्त्राचे वार

एमपीसी न्यूज : बहिणीला रस्त्यामध्ये अडवून प्रपोज करणाऱ्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या भावावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप चौकातील रीक्षा स्टॅंडवर हा प्रकार घडला.

याप्रकरणी सिद्दिक रफीक खान (वय 22) यांनी तक्रार दिली असून असलम शेख याच्या विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी असलम शेख यांनी सात ते आठ महिन्यांपूर्वी फिर्यादीच्या बहिणीला रस्त्यामध्ये अडवून प्रपोज केले होते. याच कारणावरून फिर्यादी यांनी त्याला समजावून सांगितले असता याचा राग मनात धरून असलम शेख याने फिर्यादी याच्यावर चाकुने कानाच्या मागे आणि मानेवर वार करत गंभीर जखमी केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.