Pune News : मदतीसाठी आलेल्या पोलिसाचीच गचांडी धरली, पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : ‘तुम्ही पोलिस नेहमीच उशिरा येता, आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही येणार का’ असा प्रश्न विचारून मदतीसाठी आलेल्या पोलीसा सोबतच धक्काबुक्की करण्यात आली. इतकेच नाही तर गणवेशात असताना देखील एकाने पोलिस कर्मचाऱ्यांची गचांडी धरली. मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर मध्ये हा प्रकार घडला. 

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत बालाजी केंद्रे (वय 32) यांनी फिर्याद दिली असून शंकर पोटे (वय 30) आणि दिपाली पोटे (वय 25) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर 3 मध्ये भांडणाचा प्रकार असून त्या ठिकाणी मदतीची आवश्यकता असल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर फिर्यादी आणि पोलीस शिपाई धालपे हे त्याठिकाणी पाच मिनिटात पोहोचले असताना आरोपी शंकर पोटे यांनी ‘तुम्ही पोलिस नेहमी उशिरा येता, आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही येणार का?’ असे बोलून फिर्यादीचे अंगावर धावून येत त्यांच्या शर्टची गचांडी धरून धक्काबुक्की केली.

तर दिपाली पोटे हिने देखील पोलिसांसोबत धक्काबुक्की करून ‘तू माझे कपडे फाडले अशी मी खोटी तक्रार देऊन तुला कामाला लावीन असे म्हणून धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.