Pune News : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला आळंदी येथे घेऊन जात तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या एका तरुणाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. जुलै 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. खडक पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार 29 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी आणि आरोपी रेंज हिल्स येथे एकाच परिसरात राहतात. पिडिता ही पंधरा वर्षीय अल्पवयीन आहे. आरोपीने ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिला आळंदी येथील वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जातात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार उघड झाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.