Pune : आता पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? शरद पवारांनी दिले उत्तर..

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणारा गुरूजन गौरव सोहळा कार्यक्रम रद्द 

अजित पवारांच्या या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाची भूमिका ही स्पष्ट केली. अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचं यावेळी पवार म्हणाले. यावेळी पवार यांना भविष्यातील आश्वासक चेहेरा कोण अस विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवार हाच भविष्यातील आश्वासक चेहेरा असेल असे हात उंचावून सांगितले.

 

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, २ दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती. आणि आज त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या सरकारमध्ये घेतले.  याचा अर्थ पंतप्रधान यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते तर त्याबाबत पक्षाच्या लोकांना आणि ज्याच्यावर आरोप केले त्यातून त्यांनी त्यांना आत्ता मुक्त केल आहे. त्यामुळे मी आत्ता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.

 

यावेळी अजित पवार यांच्या बंडाबाबत पवार म्हणाले की, आमच्या काही सहकार्यानी पक्षाच्या भूमिके पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. उद्याच्या 6 तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती आणि त्यात काही बदल होते.

 

त्यात संघटनात्मक बदल होण्याचे विचार होता पण त्या पूर्वीच पक्षातून वेगळी भूमिका घेतली आणि आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. माझं मत आहे की पक्षातील काही सदस्य यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली याचे खरे चित्र लोकांच्या समोर येईल. ज्यांची नावे आली त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आमच्या सह्या घेऊन आमची भूमिका वेगळी आहे असं मला सांगितलं आहे. अस देखील यावेळी पवार म्हणाले.

 

दरम्यान अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील (Pune) निवासस्थानाबाहेर तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. त्यावेळी त्यांनी आम्ही सदैव शरद पवार साहेबांबरोबर असल्याचे सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.