Chinchwad : महिलांनी उद्योग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – के. जी. डेकाटे 

एमपीसी न्यूज – अनेक महिलांनी आपल्या प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर आपला स्वत:चा उद्योग व्यवसाय स्थापन करून समाजात व औद्योगिक क्षेत्रात ठसा उमटविला आहे. यांचा आदर्श घेत तळागाळातील महिलांनी आपल्या संसाराला हातभार लावत उज्वल भविष्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून  स्वत:चा उद्योग व्यवसाय स्थापन करावा, असे आवाहन पुणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. जी. डेकाटे यांनी केले.  

पुणे येथील शासन मान्य महिला विकास फाउंडेशन या संस्थेने पुणे शहर व परिसरातील महिलांसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महिला उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन  केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सरकारचे महिला औद्योगिक धोरण, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, उद्योग आधार आदी योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

पुणे  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. जी. डेकाटे यांचे अभिजित पवार यंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सुलभा उबाळे होत्या. नाशिक येथील  एस .के. डी. इंटरन स्कूलच्या सचिव मीना देवरे, महिला विकास फौंडेशनच्या  संचालिका पियुषा पवार, सीए श्रद्धा अग्रवाल, एसकेडी कन्सल्टन्ट प्रा लिमिटेडचे संचालक अभिजित पवार, मार्गदर्शक मिलिंद आहेर, उद्योग निरीक्षक संजीव देशपांडे,  संस्थेचे जनसंपर्क अधिकारी डॉ.किशोर कुवर, कीर्ती घोलप  आदी उपस्थित होते.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखाधिकारी शकुंतला श्रीनिवासन यांनी मुद्रा कर्ज वितरणबाबत सविस्तर माहिती दिली. ज्यांना खरोखर उद्योग व्यवसाय उभारायचा आहे. अशा इच्छुक महिलांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मिटकॉनचे मुख्य व्यवस्थापक गणेश खामगळ म्हणाले, यशस्वी उद्योजक होण्यासाठी सर्वप्रथम इच्छाशक्ती असणे महत्वाचे आहे. त्यांनी अनेक उदाहरण देत  महिलांशी संवाद साधत महिलांचे उद्योगात असलेले योगदान स्पष्ट केले. महिला उद्योजिका उत्कर्षा कुलकर्णी यांनी आपल्या यशस्वी मसाले उद्योगाबद्दल माहिती देत उद्योग वाढीसाठी काय काय उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती दिली.

उद्योजिका मनिषा वडेर यांनी आपल्या मार्गदर्शनात विविध उद्योगांमध्ये ऑटोमेशन इंडस्ट्रीजचे महत्व सांगितले. अभय भोर यांनी महिलांची उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन केले. कात्रज येथील गारमेंट क्षेत्रातील उद्योजक सचिन जरेकर यांनी गारमेंट उद्योगातील संधी असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

उपस्थित निवडक महिलांना संस्थेच्या संचालिका सुलभा उबाळे यांनी टेलरिंग क्षेत्रात तात्काळ रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले. महिला उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा देशपांडे यांनी केले. तर, संस्थेचे प्रास्ताविक कीर्ती घोलप यांनी केले. पियुषा पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी पवार, प्रकाश पवार, सागर गांगुर्डे विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.