Tathwade : यशदा ताथवडे येथे सांस्कृतिक भवन उभारणार

एमपीसी न्यूज – यशदाच्या वतीने ताथवडे येथे सांस्कृतिक सभागृह (Tathwade) उभारण्याचे प्रयोजन आहे.  भवन उभारताना इतर सांकृतिक भवनांची माहिती घेऊन परिपूर्ण सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे विचारधीन असल्याचे  यशदाचे महासंचालक  एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग.दि.माडगूळकर नाट्यगृहाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम यांनी आज (मंगळवारी) भेट दिली. आयुक्त शेखर सिंह यांनी या नाट्यगृहाची विस्तृत माहिती त्यांना दिली.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे,बाळासाहेब गलबले, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे उपस्थित होते.

महापालिकेने वेगळ्या प्रकारे अत्याधुनिक नाट्यगृह उभारले असून (Tathwade) यामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे. शहरात प्रगल्भ रसिक श्रोते निर्माण होतील असा विश्वास चोक्कलिंगम यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्यासमवेत यशदाचे भूमी जिंदगी विभागाचे प्रमुख राज ठाणगे, स्थापत्य अभियंता रवींद्र आव्हाड, वसतीगृह व्यवस्थापक अजय दिवटे, समन्वयक शितल कचरे शिष्टमंडळात सहभागी होते.

महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे सर्व आत्याधुनिक सोयी सुविधायुक्त नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये नाट्यगृहाच्या तीन मजली मुख्य इमारती अंतर्गत तळमजल्यावर कलादालन व कॅफेटेरियाचा समावेश आहे.

पहिल्या मजल्यावर प्रशस्त लॉबी पॅसेजव्दारे नाट्यगृहाचे मुख्य प्रवेशव्दाराचा अंतर्भाव आहे. पाच मजली स्वतंत्र इमारतीसाठी स्वतंत्र प्रवेशव्दार असुन इमारतींतर्गत कॉन्फरन्स हॉल, मुख्य नाट्यगृहाची आसन व्यवस्था 800 आहे. 220 आसन व्यवस्था असलेले छोटे नाट्यगृह, किचन सुविधासह उपाहारगृह इ. बाबींचा समावेश आहे. तसेच इमारतीतील चौथ्या व पाचव्या मजल्यावर 12 खोल्या तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये नाट्य कलाकार, वादक तसेच रंगमंचावर काम करणाऱ्या तंत्रज्ञ यांचेसाठी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नाट्यगृह इमारतीत दोन मजली तळघर असुन, त्यामध्ये 120 चारचाकी वाहने व 250 दुचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. इमारतींतर्गत आवश्यक अग्निप्रतिरोधक व्यवस्था, अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी स्वयंचलित जनित्र व्यवस्था,दिव्यांगासाठी स्वतंत्र रॅम्पव्दारे प्रवेशाची व्यवस्था करणेत आलेली आहे. प्रत्येकी 10 व्यक्तींच्या क्षमतेच्या आधुनिक चार लिफ्टच्या (उर्ध्ववाहिनी) मुख्य प्रवेश दालनांतर्गत समावेश आहे.

ASPIRE CUP 2023 – सांगवी एफ.सी., नॉईझी बॉईजचा सहज विजय

नाट्यगृह 8004 चौरस मीटरच्या भव्य जागेत मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आले असून बांधकामाचे क्षेत्रफळ 7758 चौरस मीटर एवढे असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.