Bhosari : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

अमोल अर्जुन परदेसी (वय 19, रा. वाकड रोड, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सुमित देवकर, समीर रासकर यांना माहिती मिळली की, कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी सापळा रचून अमोल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 20 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल जप्त जरत अमोल याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.