Crime News : अपहरण करून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस चोरी लूटमार करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. वल्लभनगर येथे एक तरुणाचे अपहरण करून त्याचा मोबाईल घेत जबरदस्ती गूगल पे वरून पैसे काढून घेतले आहेत.हा प्रकार गुरुवारी (दि.15) रात्री 11 ते 12 च्या दरम्यान घडला.

या प्रकरणी सुयश प्रमोद पाटील (वय 21 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी चालत जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला अडवून डोळ्यावर, पोटात बुक्क्या मारत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत गादीवर जबरदस्ती बसवून घेऊन जात त्यांचा मोबाईल काढून घेतला व गुगल पे द्वारे जबरदस्ती पैसे काढून घेतले.यावरून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.