Vadgaon Maval : महिला सुरक्षा कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज वडगाव मावळ येथे बांधकाम साईट वर तैनात असलेल्या तीन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत तरुणाने हुज्जत घालून गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग (Vadgaon Maval) केल्याच्या आरोपावरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ येथील सर्व्हे नंबर 87/2 अ व सर्व्हे नंबर 86/1 येथे घडला.

याप्रकरणी महिला सुरक्षा कर्मचारी गुरुवारी (दि.15) रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विनायक नाना म्हाळसकर  (रा. वडगाव मावळ) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षासह लाच प्रकरणात अडकलेल्या कर्मचा-यांचे निलंबन रद्द

या संदर्भात दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधीत जागा ही आरोपीच्या कुटुंबाकडून कायदेशीररित्या बांधकाम व्यावसायिकाला 2015 सालीच दिली आहे. त्यानुसार नंदन क्रिएशन या भागीदारी संस्थेच्या मार्फत मिलिंद पोखरकर व विनायक गारवे या बांधकाम व्यावसायिकांनी जागेवर काम करण्यास सुरुवात केली असता आरोपी व त्यांचे नातेवाईकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे 29 नोव्हेंबर रोजी काम चालू असताना फिर्यादी व त्यांच्या सहकारी तसेच एक जेसीबी घेऊन सदर मिळकतीवर काम चालू असताना आरोपीची आई तेथे आली व तिने जेसीबी चालकाला जागेवर थांबण्यास सांगून जेसीबी खाली येत किंवा पेटवून घेत जीव देण्याची धमकी दिली.

यावेळी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता तिने शिवीगाळ केली व तिच्या मुलाला म्हणजे आरोपीला फोन करून तेथे बोलावले. विनायक म्हाळसकर तेथे आला व त्यानेही महिला सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. (Vadgaon Maval) यावेळी फिर्यादी यांना धक्काबुक्की करत तसेच त्यांना ढकलून देत त्याने महिला सुरक्षा कर्मचारी सोबत गैरवर्तन केले व त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. त्यावरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.