Vadgaon Maval : जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंग शिक्षणाकरिता लागणारी यंत्रसामग्री देत स्वातंत्र्य दिन साजरा…

एमपीसी न्यूज – वडगांव मावळमधील केशवनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस कंपनी व संस्था यांच्या वतीने शालेय शिक्षणात नवीन तंत्रज्ञानानुसार शिकण्या करिता लागणाऱ्या वस्तू स्वातंत्र्य दिनानिमित्त भेट देण्यात आल्या. वडगाव येथील पूना सिम्स् ली. यांनी आपल्या सीएसआर फंडातून शाळेस रंगरंगोटी व सुशेभनाचे काम करून दिले.

यावेळी माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, प्रवीण ढोरे, विवेक गुरव लायन्स क्लब वडगावचे अध्यक्ष सुनीत कदम, जितूभाई रावळ ,बाळासाहेब बोरावके संजय भंडारी, स्थानिक पदाधिकारी,लायन्स क्लबचे सर्व सदस्य तसेच शिक्षक व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

लायन्स क्लबचे प्रांत ओमप्रकाश पेठे याच्या या वर्षीचे घोष वाक्य Service with Celebration नुसार वडगांव लायन्स क्लबच्या वतीने ई-लर्निंग करिता दोन एलईडी टिव्ही (43 “LED smart TV) उपलब्ध करून देण्यात आले. ई-लर्निंग करिता लागणारे उपयुक्त असे सॉफ्टवेअर नगरसेविका पूनम जाधव यांनी उपलब्ध करून दिले.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम सुसज्ज अशा ई-लर्निंग प्रकल्प हॉलचे उद्घाटन वडगांव मावळ नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे व पंचायत समिती सभापती सुवर्णा कुंभार उपसभापती जिजाबाई पोटफोडे गुलाब काका म्हाळसकर यांचे हस्ते करण्यात आले. या ई-लर्निंग प्रकल्पाव्दारे विद्यार्थींस शिक्षण घेने सोपे होणार असून त्यातून विद्यार्थी यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा घोरपडे व शिक्षिका छाया जाधव यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.