Talegaon News : सोमाटणे फाट्यावरील जनरेटरच्या दुकानात 1.69 लाखाची चोरी

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाट्यावरील डी. जी. पावर जनरेटर सेल्स अॅन्ड सर्व्हीस दुकानात 1.69 लाख रूपयांची चोरी उघडकीस आली आहे. दुकानाच्या पाठीमागील खिडकीची काच तोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. शनिवारी (दि.05) ते सोमवारी (दि.07) या दरम्यान सायंकाळी 6 ते 8 च्या सुमारास हा प्रकार घडला.

रविंद्र ज्ञानोबा तांबडे (वय 33, रा. देवयानी नगर, सोमाटणे) यांनी याबाबत सोमवारी (दि.07) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद | काऊंटडाऊन दहावी | दहावीच्या भूमितीची तयारी करूयात दहा दिवसांत – मनोज उल्हे | अत्यंत उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सोमाटणे फाटा येथे असलेल्या डी. जी. पावर जनरेटर सेल्स अॅन्ड सर्व्हीस दुकानाच्या पाठीमागील खिडकीची काच तोडून व दुकानात घुसले. दुकानातील 1.69 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एमपीसी न्यूज पाॅडकास्ट | पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा | पाॅडकास्ट ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.