Pimpri : पवना व खडकवासला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात दमदार पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणक्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत चालली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 158 मि.मि. पाऊस झाला आहे. तर खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल 472 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या दोन दिवसापासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव आणि पवना धरणक्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरु असून धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये हळू हळू वाढ होत चालली आहे.

पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 158 मि.मि. पाऊस झाला आहे तर 1 जूनपासून याठिकाणी 268 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या १३. टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी आजच्या तारखेला 21. 46 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गेल्या 48 तासात तब्बल 472 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक 199 मिमी पावसाची नोंद ही टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली आहे. तर सर्वात कमी सुमारे 102 मिमी पाऊस हा वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. पानशेतधरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 120 मिमी पाऊस झाला.

दरम्यान, कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.