Lonavala : पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 7.53 टक्के वाढ

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात मागील 24 तासात 61 मिमी पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठ्यात मागील 24 तासांमध्ये 1.66  टक्के वाढ झाली आहे. यंदा 1 जूनपासून धरणाच्या पाणीसाठ्यात 7.53 टक्के वाढ झाली आहे. आजमितीला धरणामध्ये 20.99 टक्के पाणीसाठा आहे.

पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 61 मि.मि. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून 557 मि.मि.पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत 572 मि.मि. पाऊस झाला होता. तर गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणामध्ये 25.43 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा 1 जूनपासून धरणाच्या पाणीसाठ्यात 7.53 टक्के वाढ झाली आहे.

दरम्यान, लोणावळा परिसरामध्ये शुक्रवारी 111 मिमी पावसाची नोंद झाली असून यंदा शुक्रवारपर्यंत 1029 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत ११०२ मिमी पाऊस झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.