Pimpri : शहरात आणखीन सहा नागरी सुविधा केंद्र; महापालिकेच्या 185 सुविधा मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आणखीन सहा नागरी सुविधा केंद्र सुरु केली जाणार आहेत. एका प्रभागात तीन सुविधा केंद्र असणार आहेत. महापालिकेच्या 185 नागरी सुविधा केंद्रात मिळत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 69 नागरी सुविधा केंद्रे होती. पहिल्या टप्प्यात 15, दुस-या टप्प्यात 28 आणि तिस-या टप्प्यात 26 असे 69 नागरी सुविधा केंद्र शहरात कार्यरत होती. प्रतिसाद मिळत नसल्याने त्यापैकी 19 केंद्रे बंद केली असून सध्या 50 केंद्रे कार्यरत आहेत. केंद्रात महापालिकेच्या 185 सुविधा मिळत आहेत. त्यामध्ये आकाशचिन्ह परवाना, वृक्ष संवर्धन, जलनि:सारण, नळजोड कनेक्शन, नागरवस्ती विभागाच्या अशा विविध सुविधा मिळत आहेत. केंद्र चालकाकडून एका अर्जामागे नागरिकाकडून 20 रुपये घेतले जातात. त्यापैकी 15 रुपये केंद्र चालकाला आणि पाच रुपये महापालिकेला मिळतात.

शहरात 32 प्रभाग असून एका प्रभागात तीन नागरी सुविधा केंद्रे दिली जाणार आहेत. दोन नागरी सुविधा केंद्रामध्ये एक किलोमीटरचे अंतर असले पाहिजे. महिन्याला नागरी सुविधा केंद्रात 20 अर्ज येणे अपेक्षित आहे. महिन्याभरात एकही अर्ज आला नसल्याने 19 केंद्रे बंद करण्यात आली आहेत. तसेच रेडझोन हद्दीत देखील नागरी सुविधा केंद्र दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.