Chikhali News: लग्न जमवण्याच्या पुजेच्या नावाने परराज्यातील इसमाने उकळले 12 लाख रुपये

एमपीसी न्यूज- वधू-वर सुचक मंडळातून नंबर मिळवून त्याद्वारे संपर्क करत परराज्यातील एका इसमाने लग्न जमवण्यासाठी पुजा करावी लागेल म्हणत महिलेकडून तब्बल 12 लाख रुपये उकळले आहेत. ही घटना सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत ताम्हाणे वस्ती चिखली येथे घडली.

Kiwale News: किवळे येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक

विशाल शर्मा (रा. जोहारीपूर, उत्तराखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने तिचे लग्न जमावे यासाठी माळी वधुवर सूचक मंडळात नावनोंदणी केली होती. तिथून आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक घेतला. फिर्यादीचे लग्न जमावे यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे आरोपीने भासवले. पूजा करण्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी 12 लाख 17 हजार 120 रुपये घेतले. त्या पैशांचा अपहार करून आरोपीने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.