Pimpri : वाहनचोरांचा उच्छाद; पिंपरी-चिंचवड शहरातून नऊ लाखांची वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या चाकण, आळंदी, निगडी, पिंपरी, तळेगाव, वाकड आणि हिंजवडी परिसरातून तब्बल नऊ लाख दोन हजार रुपये किंमतीची वाहने चोरीला गेली आहेत. यामध्ये सहा दुचाकी तर एका कारचा समावेश आहे. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. 14) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिनेश मधुकर मेश्राम (वय 31, रा. पिंपळगाव, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिनेश यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ बी 3258 ही दुचाकी आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत पार्क केली. दुचाकीचे हँडल लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 8 नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानोबा सखाराम निळकर (वय 42, रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ज्ञानोबा यांची बारा हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए जे 4347 ही दुचाकी बुधवारी (दि. 13) रात्री घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने हँडल तोडून दुचाकी चोरून नेली. ही घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम भगवान तोडकर (वय 23, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी 10 नोव्हेंबर रोजी निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

गुलाब व्‍यंकटी पवार (वय 34, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. गुलाब यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ई एल 2077 ही दुचाकी मंगळवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील परूळेकर हायस्कूलसमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी रात्री त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी (दि. 13) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल ज्ञानेश्वर फेगडे (वय 27, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल यांची 50 हजार रुपये किमतीची एम एच 14 / जी के 6413 ही दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवरंजन सत्यरंजन घठक (वय 23, रा. एक्झर्बिया टाऊनशिप, नेरे दत्तवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिवरंजन यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / इ जी 8641 ही दुचाकी बुधवारी (दि. 13) रात्री दहाच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित विजय भाटकर (वय 42, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांचे मोरवाडी पिंपरी येथे स्पार्कलर्स कार स्पा हे वॉशिंग सेंटरचे दुकान आहे. त्यांचे ग्राहक रितेश कुमार युवराज सूर्यवंशी यांनी त्यांची 7 लाख 50 हजार रुपये किमतीची एम एच 12 / आर के 1579 ही कार अमित यांच्या वॉशिंग सेंटर मध्ये बुधवारी (दि. 13) सायंकाळी सहाच्या सुमारास वॉशिंगसाठी दिली. त्यानंतर काही वेळेतच अज्ञात चोरट्यांनी अमित त्यांची नजर चुकवून कार चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.