Pimpri : सव्वालाखाच्या रोकडसह दारुच्या बाटल्या लंपास

एमपीसी न्यूज – बंद हॉटेलचे शटर उचकटून चोरट्यांनी एक लाख 27 हजार 200 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच हॉटेलमधील दारुच्या बाटल्याही लंपास केल्या. ही घटना मंगळवारी (दि. 7) पहाटे काळभोरनगर, चिंचवड येथे घडला.

राजकुमार पंचानंद गुप्ता (वय 35, गंगानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांचे हॉटेल कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप उचकटून हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमधील एक लाख 27 हजार 200 रुपये तसेच दारुच्या बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.