Vadgaon Maval : ठराव क्रमांक 374 रद्द करण्याची भाजपची मागणी

Vadgaon Maval : ठराव क्रमांक ३७४ रद्द करण्याची भाजपची मागणी

एमपीसी न्यूज- मंजुरी मिळालेल्या आणि उदघाटन झालेल्या कामांचा निधी पुन्हा सर्व प्रभागांमध्ये समान वाटप करण्याचा ठराव करण्यात आला. हा बेकायदेशीर ठराव त्वरित रद्द करावा अशी मागणी वडगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

या बाबत नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते ज्या विकासकामांची तांत्रिक मंजुरी , मिळाली ,ठराव मंजूर झाले ,आणि निधी देखील मंजूर झाला व काही दिवसांपूर्वी ज्या ज्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन झाले होते तोच निधी राजकीय आकसापोटी पुन्हा सर्व प्रभागांमध्ये समान वाटप करावा असा बेकायदेशीर ठराव नगरपंचायतने मंजूर केला आहे. यांमुळे ज्या प्रभागात ही कामे सुरू होणार होती तेथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. या ठरावाचा आणि या प्रकाराचा वडगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करीत आहोत.

या प्रसंगी वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका अर्चना म्हाळसकर , सुनीता भिलारे , दीपाली मोरे , वडगांव शहर भाजपा कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे , सचिव रवींद्र म्हाळसकर , मावळ तालुका सोशल मिडिया अध्यक्ष अनंता कुडे , युवा मोर्चा अध्यक्ष रमण ढोरे , व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा , विराज हिंगे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.