Pimpri News : जगात महिला वैमानिक सर्वात जास्त भारतात – आमोद केळकर  

एमपीसी न्यूज – जगातील 57 देशांमध्ये काम करत असलो (Pimpri News) तरी मराठी संस्कृती व ज्ञान यामध्ये मराठी माणूस सर्वोच्च असल्याचे माझे निरीक्षण आहे असे, अमेरिकेतील कॉकपिट इंजिनीअर आमोद केळकर यांनी व्यक्त केले.

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित, 18 व्या जागतिक मराठी संमेलनात ‘आकाशाशी जडले नाते’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी स्त्री वैमानिक नीलम इंगळे देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याच क्षेत्रातील मंदार भारदे यांनी या दोघांशी संवाद साधत तांत्रिक क्लिष्ट असलेला हा विषय अतिशय सुमधूर केला.

Pimpri News : ‘चंद्रपूरच्या जंगलात’ नाटकामुळे कलाकार झालो – सुबोध भावे

आपले अनुभवविश्व प्रकट करताना  केळकर म्हणाले, वेळ व कामाप्रती निष्ठा यामध्ये जपान, कॅनडा, इंग्लंड व सिंगापूर या चार देशांचा अनुक्रमे समावेश होतो. जगभरात आजही जपानी माणूस प्रत्येक काम हा आपला धर्म समजून करत असतो. विविध देशांची संस्कृती पाहताना भारताचे स्थान अजूनही का श्रेष्ठ आहे याचा परिचय पदोपदी होतो. मराठी तरुणांनी हवाई क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला तर प्रचंड कष्टाची तयारी ठेवावी व आपले वेगळेपण सिद्ध करावे असे म्हटले.

यावेळी निलम इंगळे यांनी आपले अनुभव सांगताना जगात सर्वात जास्त स्त्री वैमानिक म्हणून भारतीयांची संख्या मोठी असल्याचे नमूद केले. मुलींनी एकदा पाणी ग्रहण केल्यानंतर आपल्या करियरवर पाणी टाकू नये. तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी, ऍटो पायलट कितीही विकसित असले तरी  विमानाचे जेव्हा डोके फिरते तेव्हा आम्हाला डोकं लावावं लागतं ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. (Pimpri News) वैमानिक म्हणून आलेले संकटकालीन अनुभव तसेच जगभरातील भाषा, पद्धती व सहकाऱ्यांच्या विविध आठवणी निलम इंगळे यांनी यावेळी उलगडल्या.  पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व या संमलेनाचे  स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.