आता महापालिकेत अवतरणार महिलाराज

प्रज्ञा खानोलकर सगळ्यात तरुण नगरसेविका

एमपीसी न्यूज –  निवडणुकांच्या रणसंग्रामाद्वारे निवडून आल्यानंतर  महापालिकेच्या सभागृहात पाऊल टाकण्यासाठी अनेक नवनिर्वाचित महिला नगरसेवकांनी कंबरेला पदर खोचला आहे. घरातील जबाबदारीबरोबरच महापालिकेचे राजकारण जवळून  बघण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.



शहराची लोकसंख्या एकूण 17  लाख 27 हजार 692 इतकी आहे. त्यात 7 लाख 83 हजार इतक्या महिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून विजयी झालेल्या महिला महिलांचे प्रश्न सोडवणार का याकडे लक्ष राहणार आहे. यावर्षी महापालिका निवडणुकीत महिलाराज आल्याचे पहावयास मिळाले.

शहर विकासाची धुरा सांभाळणा-या महापालिकेसाठी 23 फेब्रुवारीला निवडणुकीचा रणसंग्राम संपला. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 128 विविध पक्षांचे नगरसेवक निवडून आले. त्यात 57 महिला आहेत, म्हणजे ही संख्या लक्षणीय आहे. आता  नगरसेविका म्हणून तब्बल 57 महिला महापालिकेत प्रवेश करणार आहेत. नागरिकांनी पाच वर्षांसाठी दिलेली जबाबदारी आणि काम करण्याची संधी आता या महिला साधणार आहेत.  संधीचे सोने करण्यासाठी शेकडो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, सर्वसाधाररण अशा विविध गटांमधून उमेदवारांनी प्रतिस्पर्धां विरोधात दंड थोपटले.

विशेष म्हणजे बहुतांश महिलांनी प्रथमच निवडणूक लढविली. अनेकांनी अद्याप महापालिकाही पाहिलेली नाही. राजकीय पक्षांकडून स्वतःला उमेदवारी न मिळाल्याने काहींनी आपल्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.

नवीन महिला आता महिला आरोग्याचा प्रश्न, महिला बचत गटाची नवीन योजना, खासगी वाहनांमधून सुरक्षित प्रवास, महिलांसाठी शहरात स्वच्छतागृहे, महिलांवरील अत्याचार, महिलांसाठी स्वतंत्र पोलीस चौकी आदी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले होते. नवीन महिला उमेदवार तरी हे प्रश्न सोडवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रज्ञा खानोलकर सगळ्यात तरुण नगरसेविका

प्रभाग 16 ब रावेत-किवळे राष्ट्रवादीमधून 7 हजार 490 मतांनी विजय मिळविला. वय अवघ 21 पूर्ण  शिक्षण एम.बी.ए. फर्स्ट टर्म. राजकारण व शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी. राजकारणाचा वारसा मला काका मनोज खानोलकर यांच्याकडून मिळाला. काकांनी राजकारण म्हणजे काय राजकारणात आल्यानंतर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे त्यांनी सांगितले.  मतदारांनी जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविणार. मतदारांच्या मदतीनेच मी निवडणूक जिंकू शकले.

नवीन 47 महिला महापालिकेत

सुनिता तापकीर, उषा मुंढे, निकिता कदम, चंदा लोखंडे, स्वाती काटे, शारदा सोनवणे, माधवी राजापुरे, निर्मला कुटे, सीमा चौगले, मीनल यादव, करुणा चिंचवडे, माया बारणे, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले, शर्मिला बाबर, शैलजा मोरे, स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर, अश्विनी जाधव, सारिका बो-हाडे, यशोदा बोईनवाड, सुलक्षणा धर-शीलवंत. नम्रता लोंढे, योगिता नागरगोजे, संगीता ताम्हाणे, अनुराधा गोरखे, भीमाताई फुगे, सुवर्णा बुरडे, अश्विनी बोबडे, कमल घोलप, सारिका लांडगे यांचा समावेश आहे.



यामध्ये शिवसेनेच्या 7, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17, भाजपच्या 39,  तर अपक्ष महिला 1 तसेच जुन्या नगरसेविकांमध्ये सीमा सावळे, आशा शेंडगे, मंगला कदम, वैशाली घोडेकर, सुमन पवळे, सुजाता पालांडे, वैशाली काळभोर, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, उषा वाघेरे यांचा समावेश आहे. आता नागरिकांनी दिलेल्या मतांचा विश्वास सार्थ करून दाखविण्याची जबाबदारी या महिलांवर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.