India Corona Update : 24 तासांत 22,270 कोरोना रुग्णांची नोंद, पॉझिटिव्हिटी रेट 1.80 टक्के

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 22 हजार 270 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 60 हजार 298 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट घटून 1.80 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 28 लाख 02 हजार 505 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 20 लाख 37 हजार 536 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.21 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्याच्या घडीला 2 लाख 53 हजार 739 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 325 कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आजवर 5 लाख 11 हजार 230 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 75.81 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 12.35 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 175.03 कोटी जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.