Chakan News : खेड मध्ये नवे 31 कोरोना रुग्ण ; 4 मृत्यु ; 6 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज  : खेड तालुक्यात बुधवारी  (दि. 1 सप्टेंबर ) 14 गावे आणि 2 पालिकांमध्ये 31 कोरोना रुग्ण मिळून आले असून 4 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

खालुंब्रे येथील 59 वर्षीय पुरुषाचा , सातकरस्थळ येथील 36 वर्षीय पुरुषाचा , महाळुंगे  येथील 45 वर्षीय पुरुषाचा आणि जऊळके खु. येथील 75 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झला आहे.  सदर चे मृत्यू मागील काही दिवसातील असून बुधवारचं दैनंदिन अहवालात ते नमूद करण्यात आले आहे.

 

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 415 झाला आहे. यापैकी 33 हजार 585 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 291 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 4 मृत्यूने 539 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 17 रुग्ण, चाकण 1, आळंदी 0, राजगुरुनगर 13 असे एकुण 31 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-चऱ्होली खु. , दावडी , होलेवाडी ,कनेरसर , कोयाळी, कुरुळी , नाणेकरवाडी, रेटवडी , सावरदरी , शेलपिंपळगाव, वरुडे या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे ; तर काळूस, सातकरस्थळ,खरपुडी बु. या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळून आले आहेत.

 दरम्यान मृत्यूच्या मागील काही दिवसांत वाढलेल्या आकड्या मुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. मृत्यूचे मागील काळात लपवलेले आकडे समोर येत असल्याची देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे.  

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.