Maharashtra News : राज्यात 4 नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 32 वर

एमपीसी न्यूज : राज्यात ४4 नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली असून आता राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे.  बुधवारी आढळलेल्या कोणत्याही ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीयेत. सर्व रुग्णांना रुग्णालयामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

राज्यातील ओमिक्रॉन रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढत आहे. राज्यात आज 2 रुग्ण उस्मानाबाद, 1 रुग्ण मुंबईत आणि 1 रुग्ण बुलढाणात आढळला आहेत. त्यामुळे राज्यात  बुधवारी  4 नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, उस्मानाबाद येथील एका रुग्णाने शारजा प्रवास केला होता. तसेच दुसरा रुग्ण त्याचा निकटसहवासित आहे.

 

तर बुलढाणा येथील रुग्णाने दुबई प्रवास केला होता. तसेच मुंबईतील आज आढळलेला ओमिक्रॉनबाधित एक रुग्णाने आयर्लंड येथून प्रवास केला आहे. हे सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत. तसेच यापैकी ३ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले असून एक रुग्ण लसीकरणास पात्र नाही. या सर्व रुग्णांचे रुग्णालयात विलगीकरण करण्यात आले आहे. या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.