Talegaon News : कलापिनी सांस्कृतिक केंद्रात बालभवन प्रशिक्षिका कार्यशाळा

एमपीसी न्यूज : कलापिनी सांस्कृतिक केंद्रात ‘कै.डॉ. मंगला परांजपे स्मृती पुष्प’ या कार्यक्रमा अंतर्गत एका विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी मुग्धा जोर्वेकर, संपदा थिटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. गरवारे बालभवन पुणे येथील प्रशिक्षिका वासंती काळे, अश्विनी गुजराथी,अमृता गुरव यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

विविध प्रकारची गाणी, खेळ, हस्तकलेच्या सोप्या सोप्या वस्तू करायला शिकवल्या. तसेच गोष्टी कश्या प्रकारे रंजक होतील त्याबद्दल पण माहिती दिली. कलापिनी संस्था आम्हाला बोलावते तो आम्हाला आमचा बहुमान वाटतो. आणि पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. असे मनोगतात वासंती काळे यांनी सांगितले.

बालभवन प्रशिक्षिका, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षिका , संस्कार वर्ग शिक्षिका तसेच लहान मुलांसाठी काम करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या. सगळ्या महिला या कार्यशाळेत खूप मनापासून, उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. मुग्धा जोर्वेकर आणि सौ.संपदा थिटे यांनी कै.डॉ.मंगला परांजपे यांच्या आठवणी सांगितल्या. जोर्वेकर म्हणाल्या, “तळेगाव मध्ये कलापिनीच्या उभारणीत मंगला बाईंचा खूप मोठा वाटा आहे. महिला मंडळ, भजनी मंडळ याद्वारे त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने संघटन केले होते.” संपदा थिटे म्हणाल्या, “मंगला बाईंच्या मार्गदर्शनाखाली संगीताची वाटचाल सुरु केली. आज जे काही कार्य घडते आहे त्यात त्यांचा सहभाग लक्षणीय आहे.” सहभागी शिक्षका, सेविकांनी कार्यशाळा बद्दल समाधान व्यक्त केले. आणि पुन्हा कार्यशाळेचे आयोजन करा असे सुचवले. या कार्यशाळेला 40 महिला उपस्थित होत्या.

संस्थेच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. मावळ तालुक्यात बालभवन संकल्पना राबवणारी कलापिनी ही पहिली संस्था आहे.गेली 20 वर्षे अतिशय उत्तम रीतीने बालभवन घेतले जाते. गेली 2 वर्षे बालभवन ऑन लाईन चालू आहे. पण लवकरच नवीन जोशात,नवीन स्वरूपात,नवीन उत्साही प्रशिक्षिकान समवेत आॕफलाईन बालभवन  नक्कीच चालू होणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या कार्यशाळेतील सहभागी नी जरूर बालभवन मध्ये शिकवायला यावे असे आवाहन ही त्यांनी केले.

बालभवन प्रमुख मधुवंती रानडे यांनी सूत्रसंचालन केले. अनघा बुरसे यांनी आभार मानले. विनया परांजपे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. पांढरे काका, रश्मी पांढरे, श्रीपाद बुरसे, विनया केसकर,रामचंद्र रानडे, दीपक जयवंत यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.