Pimpri: ‘युती होवो अथवा न होवो, भाजपचे 40 खासदार निवडून येणार’

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विश्वास, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळावे, यासाठी समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी, अशी भाजपची इच्छा आहे. शिवसेनेसोबत युतीबाबत अद्याप चर्चा सुरू झाली नाही. जे येथील त्यांच्यासह जे येणार नाहीत. त्यांना सोडून आम्ही निवडणूक लढविणार असून भाजप स्वबळावर लढल्यास 40 खासदार निवडून येतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच प्रश्न कधी संपत नसतात. एक संपला की दुसरा प्रश्न निर्माण होतो. शहरातील प्रलंबित प्रश्न राज्य सरकार आणि महापालिका मिळून सोडवतील, असेही ते म्हणाले.

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा दानवे आढावा घेत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज (गुरुवारी) ते पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. आढावा बैठकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.

यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, योगेश टिळेकर, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृहनेते एकनाथ पवार, प्रदेश पदाधिकारी उमा खापरे, महिला अध्यक्ष शैला मोळक, राजेश पिल्ले उपस्थित होते.

भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. परंतु, युती संदर्भात चर्चा सुरू झाली नाही. चर्चेला सुरुवात करायची आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. युती नाही झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना-भाजपने एकत्रित निवडणूक लढविणे गरजेचे आहे, असे सांगत दानवे म्हणाले. जे येतील त्यांच्यासह, जे येणार नाहीत त्यांना सोडून आम्ही निवडणूक लढविणार असून भाजप स्वबळावर लढल्यास 40 खासदार निवडून येतील. दररोज एक आघाडी होत असून अशा आघाड्यांचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही.

दानवे म्हणाले, राज्य सरकारचा कालावधी आणखी वर्षभर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून विस्तारत पिंपरी- चिंचवड शहरातील आमदाराला स्थान देण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल.

शहरातील प्रश्न मिळून सोडविणार
प्रश्न कधी संपत नसतात. एक संपला की दुसरा प्रश्न निर्माण होतो, असे सांगत दानवे म्हणाले, शहरातील प्रलंबित प्रश्न राज्य सरकार आणि महापालिका मिळून सोडवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 15 दिवसांत शास्त्रीकर माफ करू, या घोषणेचे विरोधकांनी फलक लावून काउंटडाऊन सुरु केल्याबाबत विचारले असता विरोधकांना आणखीन दहा वर्ष फलक लावावे लावणार आहेत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.