Pune : सोन्याच्या बिस्किटाच्या आमिषाने महिलेची 42 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची तब्बल 42 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इसमाने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना त्यांच्या मालकीच्या मोरया स्विस ग्रुप या कंपनीत दि. 6 मार्चपासून 2018 पासून 23 मे 2019 या कालावधीत वेळोवेळी सोन्याच्या बिस्कीटाच्या आमिषाने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, गुंतवणूकीनंतर त्यांना सोन्याचे बिस्कीट न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.