Bhosari: ओळखपत्र मागितल्याने वाहकाच्या तोंडावर मारले ठोसे

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकाकडे जन्मतारखेचे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र न दिल्याने एसटी वाहकाने ज्येष्ठाला पूर्ण तिकीट दिले. त्यामुळे चिडलेल्या ज्येष्ठाने वाहकाच्या तोंडावर ठोसे मारले. तसेच तिकीट मशीन हिसकावून घेऊन आपटली. हा प्रकार बुधवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास नाशिक फाटा येथे एसटीमध्ये घडला.

नंदकुमार बाळकृष्ण दाभाडे (वय-65, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाहक तायप्पा सोपान कर्चे (वय-43, रा. दत्तनगर, सासवड) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी दाभाडे एसटीने प्रवास करत होते. फिर्यादी यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे जन्मतारखेचे ओळखपत्र मागितले.

ओळखपत्र न दिल्याने एसटी वाहकाने ज्येष्ठाला पुर्ण तिकीट दिले. त्यामुळे चिडलेल्या ज्येष्ठाने वाहकाच्या तोंडावर ठोसे मारले. तसेच तिकीट मशीन हिसकावून घेऊन आपटली. सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.