Bhosari: व्यावसायिकावर धारधार हत्याराने वार

एमपीसी न्यूज – मित्राच्या भावाने एकाचे रिक्षाच्या शिफ्टचे पैसे दिले नसल्यामुळे एका व्यावसायिकावर तिघांनी डोक्यात, पाठीवर, डाव्या खांद्यावर आणि हातावर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजता मोशी येथे घडली.

गणेश किशोर लोढे (वय-20, रा. हाडेवाडी, मोशी) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून त्याने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू कांबळे (रा. मोहननगर, पिंपरी), विशाल कांबळे, बाळू (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे हाडेवाडी येथे पंक्चरचे दुकान आहे. दुकानात त्याचे मित्र शंकर सुरवसे, विनोद विश्वकर्मा, गोट्या ऊर्फ पया कचरू ओव्हाळ याच्यासोबत बसले होते. त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी गोट्याच्या भावाने राजू कांबळे याचे रिक्षाच्या शिफ्टचे पैसे दिले नसल्याचे सांगितले.

फिर्यादी यांच्या दुकानातील हवा भरण्याचे कॉम्प्रेसर घेऊन आरोपी जावू लागले. त्यास फिर्यादी गणेशने विरोध केला असता त्याच्या डोक्यावर, पाठीवर, डाव्या खांद्यावर आणि बोटावर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. तसेच 15 हजार रूपये किंमतीचे कॉम्प्रेसर जबरदस्तीने नेले. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.