Bhosari News : एटीएम कार्डची अदलाबदल करत 49 हजार लुबाडले

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटर मध्ये पैसे अनोळखी इसमाने एटीएमची अदलाबदल केली. त्यानंतर एटीएम द्वारे पैसे काढून घेत 49 हजार रुपयांची फसवणूक केली. (Bhosari News) ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी आळंदी रोड, भोसरी येथील एसबीआय बॅंकेजवळ घडली.

अतिश बाबुराव मोतेकर (वय 33, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad Crime News : तीन पिस्टल व तीन काडतुसासह सह तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोतेकर हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी आळंदी रोडवरील एसबीआय बँके शेजारी असलेल्या सीडीएम सेंटरमध्ये गेले होते. (Bhosari News) तिथे मोतेकर यांना मदत करण्याच्या बहाण्याने एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने मोतेकर यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले. त्यानंतर त्या एटीएम कार्डचा वापर करून बँक खात्यावरून 49 हजार 62 रुपये काढून घेत मोतेकर यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.