FICCI महिला आघाडीने दत्तक घेतली पुण्यातील 5 दुर्गम गावं

एमपीसी न्यूज : पुणे महिला उद्योगाच्या FICCI ने 19 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील पाच दुर्गम आणि अविकसित गावे दत्तक घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

सर्वशी ग्राम विकास योजना आणि फिक्की यांच्या वतीने हा संकल्प पूर्ण होणार आहे. या दत्तक योजनेच्या माध्यमातून गावातील रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्यासोबतच महिला व युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हा उपक्रम भविष्यात महाराष्ट्र आणि देशात आदर्श ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि फिक्कीच्या अध्यक्षा नीलम सेवलेकर यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी अध्यक्षा नीलम सेवलेकर व फिक्की महिला आघाडी यांनी वेळोवेळी जिल्हा परिषद व शासन स्तरावर बैठका घेतल्या. त्यासाठी त्यांनी हा उपक्रम आणि त्याचे महत्त्व सर्वांना सांगितले आणि त्याचेच द्योतक म्हणून  जिल्हा परिषद आणि फिक्की यांच्यात हा करार होत आहे. या अगोदर नीलम सेवलेकर याांनी लवळे हे गाव दत्तक घेतले असून ते काम अतिशय स्तुत्यपणे सुरू आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, फिक्की (FICCI) पुणे अध्यक्षा नीलम सेवलेकर, कोषाध्यक्ष सोनिया राव, उपाध्यक्षा पिंकी राजपाल, नुपूर पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व फिक्की महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Today’s Horoscope 20 October 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.