PMPML News : संचलन तुटीपोटी पीएमपीएमएलला 60 कोटी देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीएमएलला संचलन तुटीपोटी आगाऊ उचल स्वरूपात 43 कोटी आणि दिवाळीपूर्वी नोव्हेंबर 2021  करिता 16 कोटी 47 लाख रूपये आगाऊ स्वरूपात देण्यात येणार आहेत. स्थायी समितीने त्यास मान्यता दिली.

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडील 25 ऑक्टोबर 21 रोजीच्या पत्रान्वये सन 2020 – 21 च्या संचलन तुटीतून 43 कोटी आगाऊ उचल स्वरूपात मिळावेत, अशी विनंती केली आहे. महापालिकेच्या सन 2021-22  च्या अर्थसंकल्पात पीएमपीएमएल निधी या लेखाशिर्षावर 238 कोटी 21 लाखाची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये संचलन तुट 165 कोटी 71 लाख रूपये, विविध प्रकारचे पास 2 कोटी 50  लाख, बस खरेदी 70 कोटी असा खर्च गृहित धरण्यात आला आहे.

पीएमपीएमएलला सन 2021-22 च्या संचलन तुटीपोटी आगाऊ उचल स्वरूपात 43 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. सन 2020-21 च्या अंदाजित संचलनतुटीचे लेखापरिक्षण होऊन तुट कायम होईपर्यंत ही रक्कम आगाऊ द्यायची आहे. तसेच सन 2020-21 ची अंदाजित संचलन तुट 494 कोटी 17  लाख रूपये गृहित धरण्यात आली आहे. महापालिकेच्या 40 टक्के स्मामित्व हिश्श्यानुसार संचलन तुटीचा हिस्सा 197 कोटी 67  लाख रूपये नमुद केला आहे. नोव्हेंबर 2021 करिता 16  कोटी 47 लाख रूपये दिवाळीपूर्वी संचलनतुटीचे द्यावेत, अशी मागणी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक यांनी 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या पत्राद्वारे केली आहे. लेखापरिक्षण होऊन तुट कायम होईपर्यंत नोव्हेंबर 2021 करिता द्यायचे आहेत. ही बाब आर्थिक स्वरूपाची असल्याने या विषयास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.