Hinjawadi : मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सावत्र आईवर गुन्हा

एमपीसी न्यूज – नऊ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सावत्र आईसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 27) वाशी, नवी मुंबई येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपासासाठी गुन्हा हिंजवडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी नवी मुंबई, वाशी येथील रबाले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा 1 एप्रिल 2016 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत आरोपी यांच्याकडे राहण्यास होता. या दरम्यान आरोपींनी त्यास गुंगीचे औषध देऊन मारहाण केली. तसेच त्याचा लैंगिक छळ केला असल्याचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक सपना देवताळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.