Pimpri : चिटफंडच्या माध्यमातून सव्वाआठ लाखांची फसवणूक; संचालकासह सातजणांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – चिटफंडमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून एकाची सव्वाआठ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चिटफंडच्या संचालकासह सात जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र बाळू चांदारे (वय 46, रा. जनवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मानसिंग शंकर घोरपडे (वय 40, रा. चिंचवड), कैलास परब (वय 45, रा. कोरेगाव पार्क), सुशीलकुमार संघवी (वय 43, रा. प्राधिकरण, निगडी), विकास नाणेकर (वय 45, रा. निगडी), दत्तात्रय टकले (वय 59, रा. प्राधिकरण, निगडी), योगेश भोसले (वय 30, रा. खालापूर, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे यांनी पिंपरीतील कमला क्रॉस बिल्डिंग येथे ओमिशा चिटफंड कंपनी स्थापन केली. सर्व आरोपींनी आपापसात संगनमत करून चांदारे यांना प्रलोभन देऊन चिटफंडमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार चांदारे यांनी सन 2012 ते 2015 या कालवधीत 7 लाख 5 हजार रुपये हप्त्या हप्त्याने भरले. मात्र त्यानंतर मूळ रक्कम किंवा लाभांशासह सव्वा आठ लाख रुपये न देता त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.