Pune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन 

एमपीसी न्यूज – जैन सोशल ग्रुपद्वारा आयोजित रक्तदान शिबिरात 80 युनिट रक्त संकलन करण्यात आले. महावीर जन्मकल्याणक दिवसानिमीत्त रविवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डिसीपी झोन एकचे पोलीस आयुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. 

_MPC_DIR_MPU_II

यावेळी कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश सेठिया उपस्थित होते. पिंपरी चिंचवड ब्लड बँकच्या वतीने यावेळी शहापूरकर यांचा सत्कार करण्यात आला. जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष संजय जैन यांनी मनोगत व्यक्त केले. अनुप नहार यांनी सुत्रसंचालन केले तर, सचिन मुथा यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांना मेहनत घेतली. मोनिका गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.