Alandi : 10 लाखांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने 80 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने 80 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कर्ज मंजूर करून न देता इसमाची फसवणूक केली. हा प्रकार आळंदी येथे 27 जानेवारी ते 5 मे 2019 या कालावधीत घडला.

बाबाजी भरत आवारी (वय 52, रा. केळगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोनिका सिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी ते 5 मे 2019 या कालावधीत फिर्यादी बाबाजी यांच्या मोबाईल फोनवर आरोपी मोनिका सिंग नावाच्या महिलेने फोन करुन ‘कर्ज पाहिजे का’ अशी विचारणा केली. कर्ज घेण्यासाठी लागणारी पॅनकार्ड, आधारकार्ड, शॉपअॅक्ट सर्टिफिकेट, टॅक्स रिटर्न फाईल, मेल आयडी असे व्हाट्सअपवर मागवून घेतले. 10 लाख कर्ज मंजूर होत असल्याचे आरोपी महिलेने बाबाजी यांना भासविले. कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून 80 हजार रुपयांची फीची मागणी केली. हे पैसे बाबाजी यांनी गूगल पे या माध्यमातून पाठविले. पैसे घेऊनही कर्ज मंजूर केले नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंंदी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.