_MPC_DIR_MPU_III

Undri : गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात सिलेंडर फुटल्याने दोनजण जखमी

एमपीसी न्यूज- गॅस शेगडी दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक सिलेंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता उंड्री येथील अतुल नगर बसस्टॉप जवळ घडली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अतुल नगर बसस्टॉपजवळ असलेल्या सहा माजली इमारतीच्या तळमजल्यावर गॅस शेगडी दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानात गॅस शेगडी दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक सिलेंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत जखमी झालेल्या दुकानाच्या मालकासह आणखी एकास स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या दुकानात 1 कमर्शियल, 8 घरगुती व 25 छोट्या सिलेंडरचा साठा होता.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.