BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : मॉन्डेलिझ इंडियातर्फे इंदोरीतील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना शुभ आरंभ शिष्यवृत्ती

मॉन्डेलिझ इंडियाला 70 वर्षपूर्ण झाल्याबद्दल उपक्रम

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- इंदोरी येथे मॉन्डेलिझ इंडियाच्या वतीने भारतातील व्यवसायाच्या 70 वर्षपूर्तीच्या निमित्ताने इंदोरीतील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या. या शिष्यवृत्ती शुभ आरंभ या उपक्रमांतून देण्यात आल्या.

कंपनीच्या उत्पादन कारखान्यांच्या तसेच कोको लागवड क्षेत्राच्या परिसरात राहणा-या 17 ते 20 या वयोगटातील 70 हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. कंपनीचे कारखाने तसेच कोको लागवड क्षेत्र बड्डी (हिमाचल प्रदेश), इंदोरी (महाराष्ट्र), मालनपुर (मध्यप्रदेश), आणि पोल्लाची (तमिळनाडू) या भागांत आहेत.

या उपक्रमास तळेगाव नगरपरिषदेतील शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी एस. एम. गावडे, मॉन्डेलिझ इंडियाच्या कॉर्पोरेट व सरकारी व्यवहार विभागाच्या संचालक ओफिरा भाटिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सदस्य, गावाचे सरपंच, परीक्षण सदस्य यांच्याशिवाय मॉन्डेलिझइंडियाचे सदस्य उपस्थित होते.

ओफिरा भाटिया म्हणाल्या की, शिष्यवृत्तीचा उपक्रम सुरु करताना आम्हांला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. शुभ आरंभ उपक्रमांच्या माध्यमांतून गेल्या काही वर्षात अनेक लाभार्थींच्या आयुष्यांना स्पर्श करत आहोत. शिष्यवृत्तीचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षण पुढे ठेवण्यास सक्षम करेल तसेच शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो वाव देईल याबद्दल आशावादी आहोत. मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन आणि बडीफॉरस्टडी या भागीदार स्वयंसेवी संस्थाचे आभार मानले. शुभ आरंभ शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी या संस्था मदत करीत आहे.

शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी चार ठिकाणांतील 150 महाविद्यालयांतून 1200हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले. मॉन्डेलिझ इंडियाचा शुभ आरंभ कार्यक्रम 2014 पासून सुरु करण्यात आला. शालेय मुलांना आरोग्यपूर्ण आहाराचे महत्व पटवून देत तसेत लहान मुले अधिक निरोगी व देशाचे अधिक चांगले नागरिक व्हावीत असा उद्देश यामागे आहे. शुभ आरंभ हा कार्यक्रम हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, केरळ आणि दिल्ली या भागांत सक्रिय असून यामुळे आतापर्यंत सुमारे 100000 लाभार्थींच्या आयुष्यांवर प्रभाव पडला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.