Nigdi : शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्व

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवरायांचा विचारांचा प्रसार व त्यांच्या कार्यांचा प्रचार, प्रसार होण्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तीन दिवसात विविध कार्यक्रम होणार आहेत.

याबाबतची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनी दिली. निगडीतील भक्‍ती-शक्‍ती शिल्प समुह उद्यान येथे होणा-या प्रबोधन पर्वाचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी पाच वाजता उद्‌घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव असतील.

रविवार (दि.17) रोजी शाहीर देवानंद माळी या झी सिनेमा वरील कलाकाराचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. सोमवार (दि. 18) स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमानंतर डॉ. अमोल कोल्हे यांचा जेष्ठ विचारवंत व लेखक डॉ. आ.ह. साळुंके यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

मंगळवार (दि. 19) ढोल- ताशा स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी 6 ते 10 या कालावधीत 2 मजली रंग मंचावर मराठ्यांचे गौरव गाथा हे 250 कलाकारांचे महानाट्य सादर होणार आहे. पिंपरी-चिंचवड वासियांनी प्रथमच साजरा होत असलेल्या या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे, आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.