Hinjawadi : बँकेतून बोलत असल्याचे सांगून पाऊण लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज- बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एकाने ज्येष्ठ नागरिकाला पाऊण लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. या प्रकरणी सोमवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक वामन व्यवहारे (वय 67, रा.लालबहाद्दूर शास्त्री वार्ड, भंडारा) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठाचे नाव असून अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवहारे हे बावधन परिसरात असताना त्यांना एक फोन आला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून भामट्याने त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांना एटीएम कार्डची व ओटीपी नंबर बाबत माहिती विचारली. व्यवहारे यांनी माहिती दिली असता आरोपीने त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून ७९ हजार ९९७ रुपये काढून घेतले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.