Pimpri : पालखी सोहळ्यातील वारक-यांची गैरसोय होऊ नये दक्षता घ्या – दत्ता साने

एमपीसी न्यूज – जगत्‌गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 24 जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान 23 जून रोजी आगमन होत आहे. दोन्ही पालख्या पिंपरी-चिंचवड शहरातून जात आहे. पालखी सोहळ्यातील वारक-यांना महापालिकेतर्फे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वारक-यांची कोणतीही गैरसोय होऊ नये. याची दक्षता घ्यावी. भेटवस्तू देण्याबाबत सुयोग्य नियोजन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

जगत्‌गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 24 जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान 23 जून रोजी आगमन होत आहे. गेल्या 30 वर्षांपासून संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरातून जाते, पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असतो. त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी पालखी तळावर वारक-यांसाठी शौचालयाची सुविधा अपुरी असल्याचे दिसून आले. दरवर्षी महापालिका पालखी मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने अगोदर नियोजन करीत असते. सुयोग्य नियोजनामुळे येणा-या वारक-यांची कोणतीही गैरसोय होत नव्हती व पुढील वारीसाठी वारकरी सुखासमाधाने मार्गस्थ होत असत.

यावर्षी पालखी ज्या मार्गावरुन जाणार आहे, त्या मार्गावर मेट्रोचे काम चालू आहे. त्या अनुषंगाने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी, आकुर्डी येथील पालखी तळावर वारक-यांसाठी सर्व सोई सुविधा पुरेशा प्रमाणात पुरविण्यासाठी तसेच पालखीमधील दिडींसाठी महापालिकेमार्फत दरवर्षी भेटवस्तू दिली जाते. गेल्यावर्षी भेटवस्तू बाबतही गोंधळ झालेला होता. ऐनवेळी धावपळ झाली होती. त्यामुळे यावर्षी पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, पालखी तळावरील सोयी सुविधा तसेच पालखीमधील दिडींसाठी भेटवस्तू याबाबत सुयोग्य नियोजन करण्यासाठी आतापासूनच सर्वपक्षीय गटनेत्यांची व शहरातील सांप्रदायिक क्षेत्रातील तज्ञांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे. याबाबत महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.