Akurdi : महिला दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना दळवीनगर येथे अन्नदान

एमपीसी न्यूज- संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या संत जिजाबाई महिला दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना दळवीनगर येथील पंढरीनाथ विनायक दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प जालिंदर काळोखे महाराज, प्रवचनकार सुप्रियाताई ठाकुर (पाटील) दिंडी मालक विजयाताई साठे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी औद्योगिकनगरीत आगमन झाले. आकुर्डीत पालखीचा मुक्काम झाला. त्यामध्ये संत जिजाबाई महिला दिंडी देहु ते पंढरपूर सहभागी झालेली आहे.

यावेळी अनिकेत दळवी मित्र परिवाराच्या वतीने संत जिजाबाई महिला दिंडीतील सहभागी वारकऱ्यांसाठी साड्या व पोषाख देण्यात आले व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.