Pune : विधानसभा निवडणुकीतील काळ्या पैशांवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवणार; पुराव्यासह माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – राज्यात नुकत्याच आगामी विधानसभा निवडणुकांची रूपरेषा जाहीर झाली असून या निवडणुकीत काळा पैसा, रोख, सोने-चांदी व्यवहार, आदींवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवणार आहे. तसेच अशा काही बाबींची माहिती पुराव्यासह देण्याचे आवाहन (पुणे विभाग) महासंचालक एम. के. दुबे, अतिरिक्त संचालक (अन्वेषण) संदीपकुमार साळुंखे, मुख्य संचालक जयराज काजला यांनी नागरिकांना केले आहे.

रोख आणि इतर मौल्यवान वस्तूंचा देवाणघेवणीवर राज्य आणि केंद्रीय विभागाचा समन्वयाने तसेच स्वतः चा अधिकारात बारीक लक्ष ठेवून आहे. प्राप्तिकर अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्यातील विमानतळावर बाळगण्यात येणाऱ्या रोख रकमेचा स्रोत नागरिकांना द्यावा लागणार आहे. रोख व्यवहाराबाबत बँकेशी चर्चा करणयात आली आहे.

पुणे आणि नागपूर येथे दोन 24 बाय 7 नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. काळ्या पैशाचा तक्रारी, माहिती देण्यासाठी पुण्याकरिता टोल फ्री क्रमांक 1800-233-0700 आणि 1800-233-0701 उपलब्ध आहेत. 7498977898 या व्हाट्सप क्रमांकावर आणि 020-24268825 या फॅक्स क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर साठीचा टोल फ्री क्रमांक 1800-233-3785 आहे. 9403391664 आणि 0712- 2525844 हे अनुक्रमे नागपूरसाठी व्हाट्सप व फॅक्स क्रमांक आहे.

मुंबईसाठी टोल फ्री क्रमांक 1800-221-1510 आहे. तर, व्हाट्सप क्रमांक 9372727823/24 आहे. मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी, काळ्या पैशाचा वापर टाळण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. काळा पैसा, रोख, सोने, चांदी याची साठवणूक, वाटप याची माहिती वरील टोल फ्री क्रमांक, मोबाईल नंबर, व्हाट्सप, फॅक्स नंबरवर पुराव्यासह माहिती द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.