Pune : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या रॅलीला सुरुवात

एमपीसी न्यूज – जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या रॅलीला आज, शुक्रवारी सुरुवात झाली. या रॅलीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

माजी खासदार दिवंगत विठ्ठलराव तुपे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चेतन तुपे हडपसर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले. यावेळी काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक योगेश ससाणे, बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका नंदा लोणकर, माजी महापौर वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले उपस्थित होत्या. हडपसर मतदारसंघात भाजप – शिवसेना युतीचे उमेदवार योगेश टिळेकर, मनसेचे वसंत मोरे रिंगणात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.