Pimpri : संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीने आज दळवीनगर परिसरातील समर्थ कॉलनी तसेच बगीचा, मंदिर परिसर, भाजीवाले, परिसरातील बिल्डिंगमधील नागरिकांना घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच या आवाहनाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
सुमारे पाचशे हुन अधिक लोकांना पत्रके वाटली आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड, संदिप अवचार,परिमल बर्वे आणि शितल पालांडे यांनी दिली.