BNR-HDR-TOP-Mobile

Pune : खासदार गिरीश बापट यांच्यावर चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्याची ‘विशेष’ जबाबदारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून निवडून आणण्याची ‘विशेष’ जबाबदारी खासदार गिरीश बापट यांच्यावर देण्यात आली आहे. तशाप्रकारचे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

बापट यांचा प्रदीर्घ अनुभव व संघटन कौशल्याचा जोरावर भाजपला यश मिळेल, असेही या पत्रात म्हटले आहे. पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच तीव्र विरोध होत आहे. तशा बातम्याही प्रसारमाध्यमांतून ठळकपणे येत आहेत. खुद्द भाजपची मंडळीच नाराज आहे. त्याची खबर मुख्यमंत्र्यांचा कानावर घालण्यात आली. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बापट यांना आदेश दिल्याची कुजबुज सुरू आहे.

पाटील यांचा विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिला आहे. पाटील यांना कोथरूडमध्येच अडकवून ठेवण्याचा विरोधी पक्षांचा डाव आहे.

HB_POST_END_FTR-A2

.